व्यवसायापलीकडे जाऊन महाराष्ट्र घडवत आहोत!
ही केवळ आर्थिक मदत नाही, उद्योजकांना बळ देण्याचा, कुटुंबांचं आयुष्य सुधारण्याचा
आणि पुढच्या पिढ्यांसाठी अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा हा प्रयत्न आहे.
व्यवसायापलीकडे जाऊन महाराष्ट्र घडवत आहोत!
ही केवळ आर्थिक मदत नाही, उद्योजकांना बळ देण्याचा, कुटुंबांचं आयुष्य सुधारण्याचा आणि पुढच्या पिढ्यांसाठी अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा हा प्रयत्न आहे.
समाजाप्रती आमची बांधिलकी
समाजाप्रती आमची बांधिलकी
महाराष्ट्रात सामाजिक बदल घडवायचा असेल, तर उद्योजकता हेच सगळ्यात प्रभावी साधन आहे.

शिष्यवृत्ती कार्यक्रम
ग्रामीण महाराष्ट्रातील गरजू आणि होतकरू तरुणांना आमच्या प्रोग्राममध्ये सहभागी होता यावं, यासाठी आम्ही पूर्ण आणि अंशतः शिष्यवृत्ती देतो. आजपर्यंत 50+ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

महिला उद्योजक उपक्रम
निमशहरी आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी खास तयार केलेला उपक्रम. यात सवलतीच्या फीमध्ये ट्रेनिंग, वैयक्तिक मार्गदर्शन आणि महिलांसाठी स्वतंत्र, भक्कम सपोर्ट नेटवर्क दिलं जातं.

कृषी उद्योजक समर्थन
शेतकरी आणि शेतीशी जोडलेल्या व्यक्तींना केवळ उत्पादनापुरतं मर्यादित न राहता यशस्वी कृषी उद्योजक बनवण्यासाठी मदत. शाश्वत ग्रामीण व्यवसाय आणि भक्कम सप्लाय चेन उभारण्यासाठी लागणारं मार्गदर्शन आणि संधी इथे दिल्या जातात.

ग्रामस्तरीय व्यवसाय शिबिरे
तालुका आणि गावपातळीपर्यंत उद्योजकता शिक्षण पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या वर्कशॉप्स थेट गावात नेतो. शहरांपासून दूर असणाऱ्या लोकांपर्यंत व्यवसाय शिक्षण आणि संधी पोहोचवणं, हेच या उपक्रमाचं ध्येय आहे.

दिव्यांग उद्योजक सहाय्य
स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबी व्हायचं असलेल्या दिव्यांग व्यक्तींना खास सहाय्य, संसाधनं आणि साथ देणारी कम्युनिटी दिली जाते.

कॉर्पोरेट भागीदारी मॉडेल
शिष्यवृत्ती आणि ग्रामीण भागातील उद्योजकता प्रसारासाठी आम्ही विविध कॉर्पोरेट कंपन्यांसोबत भागीदारी करतो यातून CSR उद्दिष्टांशी जुळणारा, मोजता येणारा आणि दीर्घकाळ टिकणारा सामाजिक परिणाम घडतो.